पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जोड्या फुलांच्या

इमेज
गंमत ना.. जोडी म्हटलं की भाऊबहीण, बहिणी बहिणी  , जावा जावा , मैत्रिणी मैत्रिणी , नवरा बायको   आणि  प्रियकर प्रेयसी     अशी अनेक नाती समोर येतात.  निसर्गात तर हे अतिशय सुंदर अस काहीतरी असत.. वाटतं. म्हणजे पक्ष्यांच्या जोड्या तर अगदी प्रेमाच प्रतीक मानल्या जातात... तसच फुलांचही.. म्हणजे पूर्वी दोन फूलं पडद्यावर यायची आणि आपण कल्पना करायचो कि नायक नायिका काय करत असतिल.. अर्थात आत्ता सगळच दाखवतात म्हणा असो.. पण हि फुलं अशी जोडीने, ऐकमाकात लिन झालेली..छान वाटतात ना..  

जागतिक चिमणी दिवस

इमेज
  खरच ऐवढीशी चिमणी आणि तिचा म्हणे जागतिक दिवस.. पण का बरं असं काही करावं लागतं याचा विचार सामान्य माणसा पर्यंत योग्य पध्दतीने जाणं आजची गरज आहे.. आपली म्हणजे माणसाची #प्रगती आणि निसर्गाचा -हास हे जणू समिकरणच झालय. ज्या चिमण्या सहजच अंगणात बागडायच्या, घराच्या ओसरीत, खिडकीत घरटी करायच्या आणि बालपणीच आई.. आजी घास भरवता भरवता त्यांची ओळख करुन देतं. त्यांना वाचवण्या साठीच्या जागृती तून चिमणी दिवस जागतिक स्थरावर साजरा करायची सुरवात झाली. निसर्ग निर्मित प्रत्येक जीव या साखळी चा महत्वाचा भाग आहे आणि यात कुठली ऐक कडी खिळखिळी झाली कि बरेच दुष्परिणाम मानवाला कसे भोगावे लागतात या बाबत न बोललेलच बरं. असो फक्त ____ __ डे म्हणून शुभेच्छा देऊन भागणार नाहीचे तर या निसर्गाच संरक्षण.. संवर्धन आपली सर्वांची जबाबदारी आहे.. यातली चिमणी आपल्या अधिक जवळची.. सखी..

आज नव्याने

इमेज
परत.. परत आलेय मी माझ्या श्वासात भरून घ्यायला  हि हिरवळ, दरवळ फुलांचा अंकुरलेल नवं काही... आनंद भरायला मनातला वाटा झाल्या होत्या पुसट जरा.. त्याही होत्याच पाहत वाट परतण्याची माझ्या.. त्यांच्यात