पोस्ट्स

सिंह पर्णी(Dandelion Teraxacum officnale

इमेज
 याला मराठीत दुधाळी बत्तूर म्हणूनही ओळखले जाते. याला पिवळी छोटी फुले येतात. हिचा वापर त्वचेचे आजार, ताप, काविळ आणि अपचन या सारख्या समस्यां वर उपचार करण्यासाठी केला जातो. फुलांचे रुपांतर वाळल्यावर पांढ-या  गोल गोळ्या मधे होते. याला दुधी, बरण, दुदाल, दुग्ध फेणी अशी अन्य भाषीक नावे आहेत. हिंदीत या ला कानफुले असेही म्हणतात.

पिवळी डेझी(Yellow Daisy )

इमेज
 हि सदाहरीत वनस्पती आहे... हि सहजस जमिनीवर पसरून अच्छादन तयार करते, याला छोटी पिवळी फुले येतात. याला फ्लाँवर लाँन असेही म्हणतात. शिवाय भुई कारवी अशी हि याच नावे आहेत. याला straggler daisy.... म्हणजे विखुरलेली डेझी असेही म्हणतात 

लवण वल्ली (Chianes Violet )

इमेज
 Asystasia gangetica कुळातील हि वेल(creaper )वर्गिय वनस्पती आहे. ती जमिनीवर सहज पसरते..  दक्षिण अफ्रिका, भारत, कँमेरून, नायजेरीया व केनिया या देशात आढणारी वनस्पती,  वालुकामय जमानीत छान वाढते, तशी हि साधारण जमिनीवर, थोड्या सुर्यप्रकाशात छान वाढते. बारमही फुले जांभळी फुले. किटकांना व फुलपाखरांनाही आकर्षित करतात. याचा उच्च रक्तदाब, संधिवात, दमा, मधुमेह, कृमी नाशक म्हणून केला जातो.

भुई -रिंगनी(Solanum virginianum )

इमेज
 हि रानात, शेतात सहजच उगवणारी वनौषधी आहे. याची पाने काटेरी असतात,याला जांभळी मोहक फुले येतात तृ याच फळआकारात छोट असं वागं असत., याला कंटकारी, रान वांग, काटे रिंगणी  अशी विविध भाषां मधे बरीच नावे आहेत. यात  अँन्टी आँक्सिडंन्ट, कर्करोग विरोधी, HIV विरोधी घटक असल्यामुळे या रोगांवरच्या औषधात याचा उपयोग केला जातो.

Desert pitonia (जंगली पिटोनिया)

इमेज
 याला मेक्सिकन पिटोनिया असे ही म्हणतात. हे सदाहरीत झुडूप आहे. उगवायला अतिशय सोपे. सहजच पसरते. याची जांभळी फुले तुमच्या बागेच्या सौंदर्यात भर घालतात. या मुळेच बागेच्या कडेला, कुंडीत वा सुशोभिकरणा साठी याची लागवड करतातं.

लहान सदाफुली (tiny periwinkle )

इमेज
 ही सदाफुलीची सर्वात लहान प्रजात आहे.हि वनस्पती भारतात, महाराष्ट्र,कर्नाटक,दक्षिण -आशियायी भागात शेताच्या कडेला, रानटी भागात सहज आढळते. छोटी पिटुकली, पांढरी फुले मध्यभागी पिवळा रंग असतो, याला लांब शेंगासारखी फळे येतात, ज्यात काळ्या रंगाच्या बिया असतात.याला तिलोनी, रान-केळ, संघी अशी स्थानिक नावे आहेत.

पिळा धोत्रा (Mexican poppy

इमेज
 शेतात, माळरानावर सहजच उगवणारी हि वनस्पती आहे.याची पाने काटेरी असतात तर फुले पिवळ्या रंगाची असतात.तिच्या काटेरी पानांनमुळे तिला काटेरी धोतरा असे नाव पडले आहे.हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. खेड्यात हिचा वापर त्वचा रोगात करतात. काही आजारात हिच्या मुळ्या ण औषधं म्हणून वापरल्या जातात.याच्या बिया विषारी असतात. तरी त्याचा ही औषधात उपयोग केला जातो. काही स्थानिक जाणकार याचा उपयोग करतात. काटेरी पाने आणि विषारी बी यामुळे प्राणी हि वनस्पती खात नाहीत. अन्य भाषांमधे तिची नावे खालील प्रमाणे आहेत. कानडी - दत्तुरीगिड्डा कोंकणी - फिरंगी धत्तुरो बंगाली - सियाल कांटा मराठी - फिरंगी धोत्रा, विलायती हिंदी - सत्यानाशी, भडभाड, घमोई संस्कृत - सुवर्णक्षिरी, कटूपर्णी फुल बिया पाने आणि कळी