पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लहान सदाफुली (tiny periwinkle )

इमेज
 ही सदाफुलीची सर्वात लहान प्रजात आहे.हि वनस्पती भारतात, महाराष्ट्र,कर्नाटक,दक्षिण -आशियायी भागात शेताच्या कडेला, रानटी भागात सहज आढळते. छोटी पिटुकली, पांढरी फुले मध्यभागी पिवळा रंग असतो, याला लांब शेंगासारखी फळे येतात, ज्यात काळ्या रंगाच्या बिया असतात.याला तिलोनी, रान-केळ, संघी अशी स्थानिक नावे आहेत.

पिळा धोत्रा (Mexican poppy

इमेज
 शेतात, माळरानावर सहजच उगवणारी हि वनस्पती आहे.याची पाने काटेरी असतात तर फुले पिवळ्या रंगाची असतात.तिच्या काटेरी पानांनमुळे तिला काटेरी धोतरा असे नाव पडले आहे.हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. खेड्यात हिचा वापर त्वचा रोगात करतात. काही आजारात हिच्या मुळ्या ण औषधं म्हणून वापरल्या जातात.याच्या बिया विषारी असतात. तरी त्याचा ही औषधात उपयोग केला जातो. काही स्थानिक जाणकार याचा उपयोग करतात. काटेरी पाने आणि विषारी बी यामुळे प्राणी हि वनस्पती खात नाहीत. अन्य भाषांमधे तिची नावे खालील प्रमाणे आहेत. कानडी - दत्तुरीगिड्डा कोंकणी - फिरंगी धत्तुरो बंगाली - सियाल कांटा मराठी - फिरंगी धोत्रा, विलायती हिंदी - सत्यानाशी, भडभाड, घमोई संस्कृत - सुवर्णक्षिरी, कटूपर्णी फुल बिया पाने आणि कळी