जागतिक चिमणी दिवस
खरच ऐवढीशी चिमणी आणि तिचा म्हणे जागतिक दिवस.. पण का बरं असं काही करावं लागतं याचा विचार सामान्य माणसा पर्यंत योग्य पध्दतीने जाणं आजची गरज आहे..
आपली म्हणजे माणसाची #प्रगती आणि निसर्गाचा -हास हे जणू समिकरणच झालय. ज्या चिमण्या सहजच अंगणात बागडायच्या, घराच्या ओसरीत, खिडकीत घरटी करायच्या आणि बालपणीच आई.. आजी घास भरवता भरवता त्यांची ओळख करुन देतं. त्यांना वाचवण्या साठीच्या जागृती तून चिमणी दिवस जागतिक स्थरावर साजरा करायची सुरवात झाली.
निसर्ग निर्मित प्रत्येक जीव या साखळी चा महत्वाचा भाग आहे आणि यात कुठली ऐक कडी खिळखिळी झाली कि बरेच दुष्परिणाम मानवाला कसे भोगावे लागतात या बाबत न बोललेलच बरं.
असो फक्त ____ __ डे म्हणून शुभेच्छा देऊन भागणार नाहीचे तर या निसर्गाच संरक्षण.. संवर्धन आपली सर्वांची जबाबदारी आहे..
यातली चिमणी आपल्या अधिक जवळची.. सखी..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा